महिला व बाल विकासासाठी सर्वच विभागांच्या समन्वयासाठी प्रयत्न - यशोमती ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:36+5:302021-01-24T04:16:36+5:30
त्या पुढे म्हणाल्या की, बालगृह आणि निरीक्षणगृहासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याची ...
त्या पुढे म्हणाल्या की, बालगृह आणि निरीक्षणगृहासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. जोपर्यंत विकेंद्रीकरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात नाही, तोपर्यंत सामाजिकस्तरावर महिला व बाल विकासाच्या प्रक्रियेत जटिल समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच टाळण्याच्या दृष्टिकोनरतून तथा महिला व बाल विकास खात्याची व्याप्ती पाहता सर्वच खात्यांशी समन्वय ठेवून महिला व बाल विकास कसा साधल्या जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यानुषंगाने योजना व महिला व बालविकास धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
यासोबतच मलकापूर येथील ‘त्या’ तीन मुली सध्या अमरावती येथील सुधारगृहात आहेत. त्यांचे सध्या समुपदेशन करण्यात येत आहे. आणि ही बाब महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. मलकापूर येथीन तीन मुली गेल्या महिन्यात घरातून निघून गेल्या होत्या. त्यांना नंतर ताब्यात घेण्यात आले होते. सध्या अमरावती येथे त्या असून, त्यांची मानसिक अस्वस्थतेमुळे आक्रमकता वाढली आहे. त्यामुळे त्यांचे सध्या समुपदेशन करण्यात येत असल्याचे ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या.