आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर

By संदीप वानखेडे | Published: July 14, 2024 04:18 PM2024-07-14T16:18:14+5:302024-07-14T16:19:52+5:30

शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९, ईएम २१२५) ही छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडला जात होती. तसेच आयशर क्रमांक (एमएच २०, ईजी ८८११) मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होता.

Eicher collided with Shivshahi bus, 2 serious in buldhana | आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर

आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर

राहेरी बु. : भरधाव आयशर आणि शिवशाही बसची समाेरासमाेर धडक हाेऊन दाेन जण गंभीर तर २१ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किनगाव राजा गावाजवळ १३ जुलै राेजी रात्री घडली.

शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९, ईएम २१२५) ही छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडला जात होती. तसेच आयशर क्रमांक (एमएच २०, ईजी ८८११) मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होता. किनगाव राजा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपानजीक दोन्ही वाहनांची समाराेसमाेर धडक होऊन यामध्ये आयशर चालक अरमान एस. शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) व अन्य एकजण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात शिवशाही बसचालक के. टी. देशमुख, वाहक जी. एल. नेहवाल यांच्यासह प्रवासी जखमी झाले आहेत.

बसमधील २० ते २१ प्रवासी बचावले

शिवशाही बसमधून एकूण २० ते २१ प्रवासी प्रवास करत होते. सिंदखेड राजाजवळ नालासोपारा - वाशिम ही बस ब्रेकडाऊन झाली असल्यामुळे या बसमधील ७ ते ८ प्रवासीसुद्धा शिवशाही बसमध्ये होते. सुदैवाने या अपघातात हे सर्व प्रवासी किरकाेळ जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विनोद नरवाडे, पोलिस कर्मचारी विष्णू मुंढे, शरद ठोंबरे, शिवाजी बारगजे, मिलिंद सोनपसारे, नाजीम चौधरी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Eicher collided with Shivshahi bus, 2 serious in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.