अस्वल हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत

By Admin | Published: October 9, 2016 01:56 AM2016-10-09T01:56:04+5:302016-10-09T01:56:04+5:30

५ ऑक्टोबर रोजी अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली.

Eight Lakh aid to the deceased's family | अस्वल हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत

अस्वल हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत

googlenewsNext

बुलडाणा, दि. 0८- अस्वल हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ८ ऑक्टोबर रोजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते आठ लाख रुपयाची शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली.
५ ऑक्टोबर रोजी रात्री दिनकर बिलोरे हे अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाले. सदर बातमी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना कळल्याबरोबर वन विभागाने संबंधित अधिकारी यांच्याशी तत्काळ चर्चा करून मृत बिलोरे यांच्या कुटुंबीयांना ८ ऑक्टोबर रोजी डोंगरखंडाळा येथे वन विभागाच्या अधिकार्‍यांसोबत जाऊन आठ लाख रुपये शासनाकडून आर्थिक मदत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी झोळे, पोळ यांचे शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याबाबत सहकार्य लाभले. यावेळी सुनील तायडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, शेषराव सावळे दलित मित्र, अंकुशराव पाटील, सारंगधर पाटील, अशोकराव सावळे, किशोर चांडक, सुधाकरराव पाटील, साहेबराव चव्हाण, सुधाकर बरडे, दत्तु बरडे, शिवाजी बिलोरे, दशरथ वाघ, भास्कर सावळे, अरूण सावळे, पांडुरंग बरडे व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्ह्यात अस्वलाची दहशत कायम असून, यावर उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Eight Lakh aid to the deceased's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.