जिल्ह्यात आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:59+5:302021-09-21T04:37:59+5:30
७४ महिलांवर झाले अत्याचार जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत. यामध्ये ...
७४ महिलांवर झाले अत्याचार
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ही ग्रामीण भागातील असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवणे आता गरजेचे झालेले आहे. तेव्हा पुढील काळात याबाबत कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत वाढ
जिल्ह्यात २०२१ या वर्षातील आठ महिन्यांत ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत. तर २०२० या वर्षातील आठ महिन्यांत ही आकडेवारी ५४ एवढी होती. तेव्हा जिल्ह्यात सुरू असलेल्या वर्षाची अत्याचाराची संख्या लक्षणीय असून, महिलांच्या सुरक्षेसाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तपास ९९ टक्के
जिल्ह्यात जरी महिलांवरील अत्याचार वाढले असले तरी दुसरीकडे मात्र, पोलिसांच्या तपासाची गतीही उल्लेखनीय आहे. कारण, झालेल्या ७४ अत्याचारापैकी ७३ प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांंना यश आले आहे. जे की २०२० या वर्षात शंभर टक्के एवढे होते.
२८६ विनयभंगांची नोंद
जिल्ह्यात अत्याचाराबरोबरच विनयभंगाच्या घटनांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत तब्बल २८६ महिला-मुलींचे विनयभंग झाले असल्याची नोंद आहे. २०२० या वर्षात ही संख्या २७८ एवढी होती. तर तपास शंभर टक्के पूर्ण झाला होता. तो यंदा ९९ टक्के एवढा आहे.