आठ शिक्षकांना तीन वर्षापासून घरबसल्या पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:51 PM2017-08-03T23:51:27+5:302017-08-03T23:52:15+5:30
खामगाव : शहरातील नगरपालिकेच्या स्व.इंदिरा गांधी हायस्कूल(म्युनिसीपल हायस्कूल)मध्ये तब्बल आठ शिक्षक अतिरिक्त झालेले असून त्यांना घरबसल्या तीन वर्षापासून पगार दिला जात आहे. या शिक्षकांवर वार्षिक ३६ लाख ९0 हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत एक कोटीहून अधिक खर्च झाल्याचे दिसून येते. सदर गंभीर बाब नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी मुख्याधिकार्यांना दिलेल्या पत्रातून उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रभाग क्रमांक ९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी गुरुवार ३ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी यांना पत्र दिले. सदर पत्रात नमूद केले आहे की, म्युनिसीपल हायस्कूलमध्ये गत काही वर्षांपासून शैक्षणिक दर्जा घसरल्यामुळे पालकांनी या शाळेकडे पाठ फिरविली. सद्यस्थितीत वर्ग ५ ते ८ मध्ये१२१ तर वर्ग ९ ते १0 मध्ये २४१ विद्यार्थी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकूण ३६२ विद्यार्थ्यांच्या मागे २१ शिक्षकांचा भरणा आहे. यावरुन १७ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असून शासन निर्णयानुसार ८ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. या शिक्षकांना शाळेत एक तासही कार्य न करता मागिल ३ वर्षापासून वेतन देण्यात येत आहे. यापोटी शासनास ३६ लाख ९0 हजार रुपये वार्षिक वेतन घरी बसलेल्या शिक्षकांना द्यावे लागते. यानुसार आतापर्यंत एक कोटीहून अधिक शासनाची रक्कम व्यर्थ खर्च झाल्याचे दिसून येते. एकीकडे खासगी संस्था भरभराटीस येत आहेत. शासनाच्या शाळेवर अफाट खर्च होवूनही शाळेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. इतरही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक नगरपालिकेच्या इतरही शाळांमध्ये पटसंख्या रोडावलेली असून या शाळेत काही शिक्षक अतिरिक्त ठरलेले असण्याची शक्यता आहे.