४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:27 AM2020-12-26T04:27:18+5:302020-12-26T04:27:18+5:30

मेहकर : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. गत दाेन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात ...

Election campaign for 41 gram panchayats | ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

Next

मेहकर : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. गत दाेन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून कडाक्याच्या थंडीत राजकीय धुराळा सुरू आहे. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तालुक्यातील डोणगाव, मादनी, कनका बु, लोणीगवळी, गोहगाव, लावणा, शेलगाव देशमुख, पांगरखेड, विश्वी, आरेगाव ,जवळा, नागापूर, मोहना बु.व खुर्द, मांडवा समेत डोंगर, देऊळगाव साखरशा, बोथा, घाटनांद्रा, नायगाव दत्तापूर, फैजलापूर, अंजनी बु.,उमरा, शहापूर, मोळा, हिवरा खुर्द, वरूड, शिवाजीनगर, गजरखेड ,शेलगाव काकडे, सावत्रा, गोमेधर, सारशिव, दादुलगव्हाण, गणपूर, बोरी, विवेकानंदनगर, ब्रह्मपुरी, सावंगी वीर, कासारखेड आणि देऊळगाव माळी आदी गावांमध्ये निवडणुकीसाठी इच्छुक कामाला लागले आहेत. ४ जानेवारी राेजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून रिंगणातील चित्र स्पष्ट हाेणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदार यादी फोटोसह असणार आहे. तसेच अनुसूचित जातीच्या जागेकरता फिकट गुलाबी, अनुसूचित जमातीकरिता फिकट हिरवा, नामप्र, प्रवर्गासाठी फिकट पिवळा व खुल्या गटाकरिता पांढरा तसेच महिला राखीव पदाकरिता याच रंगाच्या मतपत्रिका राहणार आहेत. या निवडणुकीतून सदस्य निवडून दिले जाणार असून सरपंचाची निवडणूक सदस्यांमधून करण्यात येणार आहे. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक लढविता येणार आहे. निवडणूक लढवणारी व्यक्ती संबंधित ग्रामपंचायतीचा रहिवासी असणे आवश्यक आहे .ग्रामपंचायत थकबाकीदार व्यक्ती, १२ सप्टेंबर २००१ नंतर अपत्यामध्ये भर पडून दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारे व्यक्ती पात्र असणार नाहीत. वरील सर्व गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली असून, या लगतच्या गावांमध्येसुद्धा तिचा प्रभाव राहणार आहे. तसेच नगरपालिका हद्दीत आचारसंहिता नसली तरी नगरपालिका हद्दीत ग्रामीण मतदारांवर प्रभाव पाडणारी कृती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ,असे आवाहन तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी डाॅ.संजय गरकल यांनी केले आहे.

३६७ जागांसाठी हाेणार मतदान

मेहकर तालुक्यातील ९८ पैकी ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. तसेच १३९ प्रभागांतून ३६७ ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १५४ मतदान केंद्रे राहणार आहेत. तालुक्यातील ७९ हजार २७३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४१ हजार ४०२ पुरुष, तर ३७ हजार ८७१ महिला मतदारांचा समाेवश आहे.

Web Title: Election campaign for 41 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.