गुप्त मतदान पद्धतीने तंटामुक्त अध्यक्षांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:32+5:302021-09-02T05:14:32+5:30
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३१ ऑगस्ट रोजी बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले ...
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३१ ऑगस्ट रोजी बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी समाधान भगवान बनकर, बद्रीनारायण सुधाकर गावडे, गणेश मूर्तडकर या तिघांचे अर्ज प्राप्त झाले होते; तर अनिल शेषराव पंधे यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी अध्यक्षपदी सरपंच चंदा गुलमोहर व उपसरपंच भास्कर खुळे यांची उपस्थिती होती. यावेळी गावातील ४७६ नागरिक ग्रामसभेसाठी उपस्थित होते. यामध्ये समाधान भगवान बनकर यांची महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी निवडणूक मतदान पद्धतीने बहुमताने निवड झाली. यामध्ये मतदानाद्वारे समाधान बनकर यांना ३१९ मते पडली; तर बद्रीनारायण गावडे १०९, गणेश मूर्तडकर यांना १२ मते मिळाली. उर्वरित २७ मते बाद झाली.