नरेश बोडखे यांची केंद्रीय आयाेगाच्या संचालकपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:02+5:302021-08-22T04:37:02+5:30
डाॅ. नरेश बाेडखे यांनी एम. ए. अर्थशास्त्र, सेट, नेट, पीएच.डी. केल्यानंतर त्यांची चेतना कॉलेज, मुंबई येथे प्रथम नियुक्ती करण्यात ...
डाॅ. नरेश बाेडखे यांनी एम. ए. अर्थशास्त्र, सेट, नेट, पीएच.डी. केल्यानंतर त्यांची चेतना कॉलेज, मुंबई येथे प्रथम नियुक्ती करण्यात आली हाेती़. त्यानंतर त्यांनी गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे अठरा वर्षे संशोधन आणि अध्यापन केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये सल्लागार म्हणून कामाचा अनुभव, पंधराव्या वित्त आयोगास महाराष्ट्राच्या धोरणाचा अभ्यास केला आहे. ‘महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल’ या विषयावरील उच्चस्तरीय केळकर समितीमध्येही काम केले आणि सध्या नीती आयोगाच्या तज्ज्ञ समितीमध्ये आणि यांच्या वरील अभ्यासासाठी तज्ज्ञ म्हणून काम करत आहे .याव्यतिरिक्त अनेक संशोधन प्रकल्पांमध्येही काम करण्याचा अनुभव आहे. जसे जालना जिल्ह्याची वीस वर्षांचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ बनविले आहे. याचबरोबर गव्हर्नर साहेबांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी गावाचेही नियोजन, आराखडे तयार केले आहेत. संचालन भिकाजी इंगळे यांनी, प्रास्ताविक भास्कर शिंदे यांनी, तर आभार प्रदर्शन विनायक काकड यांनी केले. कार्यक्रमासाठी संतोष बनकर, संतोष रनमळे, नीलेश भांगडीया, विशाल भांगडीया, रावसाहेब मोरे, संदीप बनकर आदींनी परिश्रम घेतले.