मेहकर तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील सरपंचांची निवडणूक पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:07+5:302021-02-13T04:34:07+5:30

यामध्ये मादनी येथे सरपंचपदी शोभा मारोती मेटांगळे, उपसरपंचपदी रंजना पंडित मेटांगळे, सावंगी विर येथे सरपंचपदी लक्ष्मी जनार्दन लोढे, उपसरपंचपदी ...

Election of third phase sarpanch of Mehkar taluka completed | मेहकर तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील सरपंचांची निवडणूक पूर्ण

मेहकर तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील सरपंचांची निवडणूक पूर्ण

Next

यामध्ये मादनी येथे सरपंचपदी शोभा मारोती मेटांगळे, उपसरपंचपदी रंजना पंडित मेटांगळे, सावंगी विर येथे सरपंचपदी लक्ष्मी जनार्दन लोढे, उपसरपंचपदी केशव माधवराव लोढे, मांडवा समेत डोंगर येथे सरपंचपदी जनाबाई रामसिंग राठोड, उपसरपंच पदी संजय रामदास करे, मोहना खुर्द येथे सरपंचपदी नंदा महादेव शिंदे, उपसरपंचपदी अरुणा समाधान ताकतोडे, उमरा येथे सरपंचपदी लता मिलिंद खंडारे, उपसरपंचपदी नारायण शेषराव देशमुख, मोळा येथे सरपंचपदी रेणुका विजय शेळके, उपसरपंचपदी सोपान शंकर धोटे, शेंदला येथे सरपंचपदी ज्योती भुजंग राहटे, उपसरपंचपदी किशोर अनिल रहाटे, सारशिव येथे सरपंचपदी रमाबाई दादाराव जाधव, उपसरपंचपदी संजाब भिमराव ढोणे, शिवाजीनगर येथे सरपंचपदी सपना प्रकाश गोफने, उपसरपंचपदी अनिता वैजिनाथ काकडे, नागापूर येथे सरपंचपदी कल्पना समाधान गायकवाड, उपसरपंचपदी आशियाबी सय्यद शरीफ, शेलगाव देशमुख येथे सरपंचपदी रबियाबी इरफान शहा, उपसरपंचपदी विलास रामभाऊ कडक, विवेकानंद नगर येथे सरपंचपदी प्राजक्ता नितीन इंगळे, उपसरपंचपदी रमेश सुखदेव गिरी, घाटनांद्रा येथे सरपंचपदी गायत्री विष्णूदास राठोड, उपसरपंचपदी मनोज शेषराव पंडित, शेलगाव काकडे येथे सरपंचपदी प्रिया देवानंद सरकटे, उपसरपंचपदी संगिता रामेश्वर गुंजकर, अंजनी बु. येथे सरपंचपदी लक्ष्मी अरुण ढोले, उपसरपंचपदी वैशाली रविकांत आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाॅक्स...

निवडणूक विभागाच्या चुकीने उडाला गोंधळ

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे मंगळवारी सरपंच व उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या ठिकाणी सरपंचपदी संदीप अर्जुन आल्हाट, उपसरपंच पदी अविनाश सुरेश राठोड यांची निवड झाली होती. तसे प्रोसिडिंग रजिस्टरला सुद्धा नोंद घेण्यात आली होती. मात्र मेहकर येथील निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपसरपंचपदी अविनाश राठोड यांचे नाव देण्याऐवजी अमृता गणेश गायकवाड यांचे नाव प्रसिद्धीकरिता दिल्यामुळे गोंधळ उडाला. ही चूक लक्षात आल्यानंतर निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी दुरुस्त करून उपसरपंचपदी अविनाश सुरेश राठोड यांच्या नावाची नोंद केली आहे.

Web Title: Election of third phase sarpanch of Mehkar taluka completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.