सेवा सहकारी सोसायटी व बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:19 AM2021-08-07T11:19:58+5:302021-08-07T11:20:08+5:30

Khamgaon News : कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाले असून, कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. 

Elections for service co-operative societies and market committees were delayed | सेवा सहकारी सोसायटी व बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या

सेवा सहकारी सोसायटी व बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या

googlenewsNext

- विवेक चांदूरकर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाले असून, कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. 
जिल्ह्यातील १३ पैकी १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली आहे. शेगाव बाजार समिती वगळता खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा, चिखली बाजार समित्यांमध्ये सध्या प्रशासक कामकाज पाहात आहेत. यापैकी काही बाजार समित्यांनी मुदत संपून दोन वर्षे झाले आहेत.  मार्च, २०२० पासून बाजार समित्यांची निवडणूक झाली नाही. दरवर्षी निवडणुकीबाबत नवीन निर्णय होतो. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यात येतात. या वर्षी ३१ ऑगस्टनंतर निवडणुका घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ २२ ऑगस्ट, २०२० रोजी संपला आहे. तेव्हापासून येथे प्रशासक आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांआधी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. 
या निवडणुका ३१ ऑगस्ट, २०२१ नंतर घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नेहमी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ सप्टेंबरनंतरच घेण्यात येतात. सेवा सहकारी सोसायट्यांमधील मतदार शेतकरी असतात. जून ते सप्टेंबरपर्यंत कृषीचा हंगाम सुरू असतो. या दरम्यान निवडणुका घेतल्या, तर शेती कामे प्रभावित होतात. त्यामुळे नेहमी सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक ३१ सप्टेंबरनंतर घेण्यात येते. या वर्षी ३१ ऑगस्टची मुदत देण्यात आली असली, तरी अद्याप निवडणुकांची कोणतीही तयारी सुरू झाली नाही. 


मर्ज केलेल्या सेवा सहकारी सोसायट्या झाल्या रद्द     
 सेवा सहकारी सोसायट्या मर्ज करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार, शेगाव, नांदुरा, मलकापूरच्या सेवा सहकारी सोसायट्या मर्ज केल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्या मर्ज केल्या नसल्यामुळे ज्या तालुक्यातील मर्ज केल्या होत्या, त्याही रद्द करण्यात आल्या.  


कोरोनामुळे मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांची निवडणूक ३१ ऑगस्टपर्यंत न घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. पुढील आदेश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील शेगाव वगळता, सर्व बाजार समित्यांची मुदत संपली आहे.
- एन.ए. कृपलानी, 
प्रभारी निबंधक, बुलडाणा

Web Title: Elections for service co-operative societies and market committees were delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.