बुलडाणा जिल्ह्यातील ३९ ग्राम पंचायतच्या रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:47 PM2018-04-24T23:47:08+5:302018-04-24T23:47:08+5:30
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
आयोगाच्या आदर्श आचार संहिता त्या-त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपयर्ंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकार्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
निवडणुकीची अधिसूचना २७ एप्रिल २0१८ रोजी संबंधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्र ७ मे ते १२ मे २0१८ पयर्ंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४.३0 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. या निवडणुकीचे मतदान २७ मे २0१८ रोजी सकाळी ७.३0 ते सायं. ५.३0 वाजेपयर्ंत होणार असून, मतमोजणी २८ मे २0१८ रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.