प्रवाह सुरू असतानाही विद्युत तारा जमिनीवर
By admin | Published: June 20, 2017 01:25 PM2017-06-20T13:25:36+5:302017-06-20T13:25:36+5:30
विद्युतरोहित्रांमधून विद्युत तारा विद्युत प्रवास सुरू असतानाही जमिनीवरपडलेल्या आहेत.
बुलडाणा : शहरातील विविध मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत
रोहित्रांमधून विद्युत तारा विद्युत प्रवास सुरू असतानाही जमिनीवर
पडलेल्या आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी बऱ्याच वेळा तक्रारी
केल्यानंतरही अद्याप त्या दुरुस्थ करण्यात आलेल्या नसून यामुळे मोठी हानी
होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या विद्युत तारा पूर्ववत करुन
रोहीत्राला झाकण लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
विज वितरण कंपनीकडून नेहमीच ग्राहकांची हेळसांड होत असून नेहमी विजबिल
जादा येणे, विजबिल वेळेवर न मिळणे, मीटर क्रमांक बदलणे, अधिकारी
ग्राहकांना न भेटणे, नागरिकांना हेलपाटे मारायला लागणे, असे प्रकार होत
असतात.विद्युत रोहीत्रातून विजेच्या अनेक तारा विज खांबावर आणि तेथून
पुढे नागरिकांच्या घरापर्यत गेलेल्या आहेत. मात्र मुख्य विज रोहीत्रातील
उच्च दाबाच्या तारा जमिनीवर लोळतांना दिसतात.
रोहीत्रातून बाहेर निघालेल्या विज तारा ज्या ठिकाणी पडलेल्या आहेत, त्या
ठिकाणी माणसांचा तसेच जनावरांचा देखील वावर नेहमीच असतो. अनावधाने या
रोहीत्रातील जिविंत तारांचा स्पर्श झाल्यास विजेचा शॉक बसून जिवितहानीची
शक्यता निर्माण होते. शहरातील तेलगू नगर, इकबाल चौक, जुने गाव, बाजार
गल्ली, स्मशानभूमी मार्ग, चिखली रोड, औरंगाबाद रोड या ठिकाणी असे चित्र
नेहमीच दिसून येते.
रोहीत्रातून तार लंपास
४शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विज रोहीत्र उडघे असून याचा फायद
अज्ञात चोरट्यांकडून घेतला जातो, बऱ्याच वेळा बॉक्स फोडून त्यामधील
तांब्याचे तार, फ्यू ही पुर्ण रोहीत्रच चोरट्यांकडून लंपास झाल्याच्या गत
दोन महिन्यात २४ घटनांची नोंद आहे. यामुळे विज वितरण कंपनीला मोठे नुकसान
सहन करावे लागते. शिवाय रोहीत्र बंद झाल्यामुळे नागरिकांना भारनियनाचा
फटका बसतो.