जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले! पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू

By ब्रह्मानंद जाधव | Published: October 27, 2023 05:42 PM2023-10-27T17:42:51+5:302023-10-27T17:43:16+5:30

वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे.

Electricity bill of 107 crores is exhausted in the district Electricity supply will start only after payment of reconnection fee |  जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले! पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू

 जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले! पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू

बुलढाणा : वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे. परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडील १०७ कोटी रूपयांच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही वीज बिल वसुली मोहिमेला आता वेग आला आहे.

परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे या वसुली मोहिम तीव्र करून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा तत्काळ ऑनलाईन प्रणालीत भरण्याचे बंधन करण्यात आले असल्याने, संपूर्ण थकबाकीसह सींगल फेज साठी ३६० आणि थ्री फेज साठी ६१४ रूपयाचे पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू करता येत नाही. महिन्याचे शेवटचे चार दिवस बाकी असताना परिमंडलाअंतर्गत बुलढाणा जिल्हा १०७ कोटी रूपयाचे थकीत वीजबिल येणे बाकी आहे.

शनिवार व रविवार सुरू राहणार विजबिल भरणा केंद्रे
महावितरणच्या वीजबिल वसुली मोहिमेत बिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. ग्राहकाची गैरसोय होऊ नये आणि महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळता यावी, यासाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक ऑनलाईन पध्दतीने महावितरण संकेतस्थळ, मोबाईल ॲप इत्यादी पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सोय आहे.

खंडित वीज पुरवठ्याची अधीक्षक अभियंताकडून तपासणी
वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही वीज बिल वसुली होत नसल्याने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडून आकस्मिकपणे अश्या ग्राहकांची तपासणी करण्याला वेग दिला आहे. जर ग्राहकांकडे अनधिकृत वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Electricity bill of 107 crores is exhausted in the district Electricity supply will start only after payment of reconnection fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.