वीज जोडणी तोडल्यास आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:45 PM2017-11-08T23:45:11+5:302017-11-08T23:45:41+5:30

शेतर्‍यांना आर्थीक मदत व्हावी यासाठी शासनाने सोयाबीन मालाला ५ हजार रूपये भाव द्यावा, तसेच कृषी पंपाचे कनेक्शन तोडु नये अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा  ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.

The electricity connection breaks! | वीज जोडणी तोडल्यास आंदोलन!

वीज जोडणी तोडल्यास आंदोलन!

Next
ठळक मुद्देशेतकरी हितासाठी युवा सेना आक्रमक सोयाबीनला पाच हजार रुपये भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांना भाव नाही, नोटाबंदी, विज वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतर्‍यांना आर्थीक मदत व्हावी यासाठी शासनाने सोयाबीन मालाला ५ हजार रूपये भाव द्यावा, तसेच कृषी पंपाचे कनेक्शन तोडु नये अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा  ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अतवृष्टी पिकांना भाव नसणे, नोटाबंदी, आदी कारणाने शेतकरी हतबल झाले आहेत.शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. बाजारामध्ये पिकांना भाव नाही. त्यामुळे सोयाबीनला ५ हजार रुपये, कापसाला ५ हजार रुपये, उडीद, मुग आदी पिकांना हमी भाव द्यावा, मागील हंगामात नाफेड मार्फ त खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. व्यापार्‍यांकडुन पिकांना भाव मिळत नसून शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. हमी भावापेक्षा कमी भावाने पिके खरेदी करणार्‍या  व्यापार्‍यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र  अद्यापही कोणत्याही व्यापार्‍यावर गुन्हे  दाखल करण्यात आले नाहीत. शासन अथवा सि. सि.आय.पणन महामंडळ तसेच सरकारी संस्थेव्दारे हमी भावाने माल खरेदी करावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीकेश जाधव यांच्या नेतृत्वात संबंधित अधिर्‍याकडे केली आहे. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीकेश जाधव, निरज रायमुलकर, तालुका अध्यक्ष भुषण घोडे, शहर अध्यक्ष संजय खंडागळे, तालुका समन्वयक गोपाल निकस, दत्ता गाडेकर , सुशांत  निकम, बाळराजे ठाकरे, विठ्ठल निकम, हर्षल गायकवाड, शुभम राउत, सुरज वायाळ, विकास बंगाळे, नंदु बंगाळे, संजाब ढोणे, रवि बोराडे, अमोल फंगाळ, लखन गाडेकर, वैभव शेळके, बबन सुर्जन, सुरेश नव्हाळे, योगेश नव्हाळे, किशोर भालेराव, अमोल काळे, धनंजय देशमुख, रवि गारोळे सह युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते. 

Web Title: The electricity connection breaks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.