विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 11:36 PM2016-10-31T23:36:44+5:302016-10-31T23:36:44+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरच गैरहजर.

Electricity deaths death | विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

Next

धाड (जि. बुलडाणा), दि. ३१- नळावर मोटार पंप सुरु करताना विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना धामणगांव धाड येथे ३0 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी घडली. भगवान सोनुने (५0) हे मृतकाचे नाव आहे.
३0 नोव्हेंबर रोजी सकाळी नळाला पाणी आले म्हणून भगावान सोनुने हे मोटारपंप सुरु करण्यास गेले असता त्यांना वीजेचा धक्का लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. गावातील नागरिकांनी त्यांना धाडच्या ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ दाखल केले. मात्र, या ठिकाणी डॉक्टर व इतर कर्मचारी हजर नव्हते. परिणामी जखमीस वेळेत उपचार मिळाले नाही. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. परिस्थितीचा मागोव धाड पो.ठाण्याचे पीएसआय शेवाळे हय़ांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दुरध्वनी करुन माहिती दिली. त्यानंतर तब्बल तीन तासानंतर बुलडाणा वरुन डॉ.मारोडकर हय़ांनी येथे येवून मृतकाचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला.

Web Title: Electricity deaths death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.