धावत्या बसवर कोसळली वीज
By सदानंद सिरसाट | Updated: May 26, 2024 23:45 IST2024-05-26T23:45:29+5:302024-05-26T23:45:42+5:30
महिला वाहक जखमी.

धावत्या बसवर कोसळली वीज
मलकापूर (बुलढाणा) : अकोल्यावरून मलकापूरकडे येत असलेल्या एमएच-०७, सी- ९२१७ क्रमांकाच्या बसवर वीज कोसळून एक महिला कंडक्टर जखमी झाली. तर बसमध्ये असलेले दहा ते पंधरा प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
रविवारी सायंकाळी परिसरात वादळवारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. यावेळी मलकापूर आगाराची अकोल्यावरून मलकापूरकडे येत असताना आयटीआय कॉलेज जवळ बसवर वीज कोसळली. या घटनेत बसच्या वरील पत्रा फाटला असून बसचा काच फुटल्याने महिला कंडक्टरच्या हाताला लागून महिला जखमी झाली आहे.