बुलडाण्यात वीज पडून एक ठार
By admin | Published: June 3, 2017 09:01 PM2017-06-03T21:01:48+5:302017-06-03T21:01:48+5:30
शेतात गेलेल्या ४० वर्षीय सुरेश महादू काळे या युवकाचा ३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान वीज पडून मृत्यू झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा/ लोणार: मान्सून पूर्व मशागतीच्या कामासाठी शेतात गेलेल्या ४० वर्षीय सुरेश महादू काळे या युवकाचा ३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान वीज पडून मृत्यू झाला. शुक्रवारनंतर शनिवारी सायंकाळी सुद्धा जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.
लोणार शिवारातील मोठा मारोती मंदिर परिसरात असलेल्या विक्रम महादू अंभोरे यांच्या शेतात पेरणी पूर्व मशागतिचे काम करण्यासाठी ३ जून रोजी ४० वर्षीय सुरेश महादू काळे गेले होते. लोणार परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाटसह पाऊस सुरु होता. पंरतु, पेरणी पूर्व मशागतीचे काम करत असताना अचानक अंगवार वीज पडून सुरेश काळे याचा जखमी होऊन मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक आर. पी.माळी, तलाठी विजय पोफळे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. मोताळा तालुक्यातही शनिवारी एक तास जोरदार पाऊस झाला.
तसेच वादळामुळे काही घरावरील टिनपत्रेही उडाली. तसेच वृक्ष उन्मळून पडले. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी घर तसेच शाळांवरील टिनपत्रे उडाले. तसेच शनिवारीही जोरदार पाऊस झाला. सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतकामाला सुरूवात करणार आहेत.