पाणी पुरवठा होणाऱ्या भागात वीज पुरवठ्याचा व्यत्यय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:08 PM2019-03-01T13:08:35+5:302019-03-01T13:08:40+5:30
खामगाव : तब्बल १६ दिवसांनंतर गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, पाणी पुरवठा होणाºया भागात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, नागरिकांसमोर पाणी भरण्याचा नवा तांत्रिक पेच निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तब्बल १६ दिवसांनंतर गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, पाणी पुरवठा होणाºया भागात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, नागरिकांसमोर पाणी भरण्याचा नवा तांत्रिक पेच निर्माण झाला. बराचवेळ विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने, संतप्त नागरिकांनी परिसरातील लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. त्यानंतर काहीकाळ पाणी पुरवठ्याचा अवधी वाढविण्यात आला. मात्र, वीज पुरवठ्याच्या व्यत्ययामुळे शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्यात खोळंबा निर्माण झाल्याचे चित्र होते.
ज्ञानगंगा प्रकल्पातील अत्यल्प जलसाठा आणि तांत्रिक कारणामुळे गेल्या २२ दिवसांपासून खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, १६ दिवसांनंतर शहराच्या काही भागात गुरूवारी पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, या पाणीपुरवठ्याच्या कालावधीत विद्युत पुरवठ्यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला. उंच आणि टेकडीच्या भागातील नागरिकांना अपेक्षीत पाणी मिळू शकले नाही. परिणामी, संतप्त झालेल्या नागरिकांनी परिसरातील लोकप्रतिनिधींच्या घरी धाव घेतली. त्यांनतर पाणी पुरवठा अधिकारी आणि मुख्याधिकाºयांशी संपर्क साधून, पाणी पुरवठ्याचा अवधी वाढविण्यात आला. मात्र, तरी देखील अनेकांना पाणी न मिळू शकल्याने, प्रशासनाविरोधात संबंधितांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाणी पुरवठ्यात भेदभावाचाही आरोप यावेळी काही नागरिकांनी केला. नगरसेविका अर्चना टाले यांच्या माध्यमातून शंकर नगर, यशोधरा नगरातील नागरिकांनी पाणी पुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पालिका प्रशासनाची तारांबळ!
तांत्रिक कारणामुळे ठप्प झालेला पाणी पुरवठा गुरूवारी सुरळीत झाला. मात्र, पाणी पुरवठ्यास सुरूवात होताच, पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. तर काही भागात वीज पुरवठ्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने, अनेकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचवेळी शहरातील बाळापूर फैल भागात अवैध नळ जोडणीचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. तक्रारी वाढीस लागल्याने, पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे दिसून येते.