विद्युत खांबावर चढून केला वीज पुरवठा सुरळीत!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:38 AM2017-09-27T00:38:51+5:302017-09-27T02:11:27+5:30

चिखली (बुलडाणा) :   हातणी येथील पाणी पुरवठा योजनेचा  खंडित केलेला वीज पुरवठा स्वत: खांबावर चढून पूर्ववत   केल्याप्रकरणी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री  उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.   

Electricity supply power supply is easy! | विद्युत खांबावर चढून केला वीज पुरवठा सुरळीत!  

विद्युत खांबावर चढून केला वीज पुरवठा सुरळीत!  

Next
ठळक मुद्देआमदार राहुल बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखलपाणी पुरवठा योजनेचा खंडित केलेला वीज पुरवठा स्वत:  खांबावर चढून केला पूर्ववत 

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली (बुलडाणा) :   हातणी येथील पाणी पुरवठा योजनेचा  खंडित केलेला वीज पुरवठा स्वत: खांबावर चढून पूर्ववत   केल्याप्रकरणी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री  उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.   
महावितरण कंपनीकडून चिखली तालुक्यातील १२१ पाणी  पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.  त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना  करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारी पोहोचल्यानंतर आमदार   बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत विद्युत वितरण कंपनीच्या  कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.    याप्रकरणी महावि तरणचे कार्यकारी अभियंता काकाजी रामटेके यांनी २६ सप्टेंबर  रोजी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिली.  या तक्रारीत आ. बोंद्रे  यांनी हातणीचे सरपंच विश्‍वनाथ जाधव यांच्यासोबत  वीज  पुरवठा जोडून घेतल्याचे नमूद केले आहे. सदर कृत्य विद्युत  कायदा २00३ च्या कलम १३८ नुसार विद्युत यंत्रणेला अनधिकृ तपणे छेडछाड करणारे गैरकृत्य असून, त्यांनी  सरकारी कामात  हस्तक्षेप केल्याचे म्हटले आहे.  या तक्रारीवरून विद्युत कायदा  २00३ कलम १३८, कलम १0६, ३४ अन्वये आमदार राहुल  बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

आमदार झाले आक्रमक
महावितरण कंपनीकडून कुठलीच कारवाई न झाल्याने २५ स प्टेंबर रोजी स्वत: आ. बोंद्रे विद्युत खांबावर चढले आणि त्यांनी   हातणी येथील  वीज पुरवठा पूर्ववत केला होता.

Web Title: Electricity supply power supply is easy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.