कारंजात तीन, वाशिममध्ये दोन विजचोरट्यांवर फौजदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:07 PM2018-08-25T18:07:55+5:302018-08-25T18:08:59+5:30

वाशिम : वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराविरूद्ध महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ६ ते ११ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला.

electricity thept karanja, washim | कारंजात तीन, वाशिममध्ये दोन विजचोरट्यांवर फौजदारी!

कारंजात तीन, वाशिममध्ये दोन विजचोरट्यांवर फौजदारी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराविरूद्ध महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ६ ते ११ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. दरम्यान, विहित मुदतीत दंड न भरणाºया कारंजातील तीन आणि वाशिममधील दोन ग्राहकांविरूद्ध फौजदारी दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी.तायडे यांनी शनिवारी दिली.
जिल्ह्यातील काही गावे वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून, मीटरमध्ये बिघाड करून विजचोरी करित असल्याची माहिती मिळाल्यावरून महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांच्या निर्देशावरून वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा अशा सहाही तालुक्यांमधील तब्बल २३ ठिकाणी ८५ कर्मचाºयांच्या २३ पथकांनी ६ ते ११ आॅगस्टदरम्यान छापासत्र मोहिम राबविली. यादरम्यान १२१ ग्राहक विजचोरी करताना आढळून आल्याने त्यांना १२ लाख १५ हजार ८२६ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, विहित मुदतीत दंडाची रक्कम न भरणाºया कारंजा तालुक्यातील धनज पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया रामटेक येथील नागोराव परिसे, अशेक रामटेके आणि नामदेव खिराडे या तिघांविरूद्ध आणि वाशिम येथील रमेश पुरी, मदन नोंदाणी अशा दोघांंविरूद्ध भारतीय विद्यूत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील अन्यठिकाणीही दंड न भरणारे ग्राहक कारवाईच्या ‘रडार’वर असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.

Web Title: electricity thept karanja, washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.