आणेवारी ४२ पैसे
By admin | Published: November 16, 2014 12:14 AM2014-11-16T00:14:41+5:302014-11-16T00:14:41+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा : शेतसारा माफी, वीज देयकात सूट.
बुलडाणा : पावसाने सुरुवातीला मारलेली दडी व परतीच्या पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे खरिपाचा हंगाम शेतकर्यांच्या हातून निघून गेला. आता रब्बीच्या हंगामाची स्थिती तशीच आहे. यामुळे दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढवले असून, महसूल विभागाच्या आणेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ती आणोवारी आता सुधारित स्वरूपात समोर आली असून, यावर्षी जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४२ पैसे निघाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आणेवारी ४२ पैसे निघाल्याने शेतकर्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानं तरही पिकांची नजर आणेवारी तलाठय़ांनी ६५ पैसे काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ६५ टक्के कशी, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात महसूल प्रशासनाला त त्काळ सूचना केली होती, त्यानंतर जिल्हाभरात आणेवारीबाबत राजकीय पक्षांनी निवेदन सुरू केले. दरम्यानच्या काळात अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनीही मोताळा तालुक्यातील शेतामध्ये पाहणी करून पीकपरिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्तांनाही आमदार सपकाळ व शेतकर्यांनी तोट्याच्या शे तीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली. सुरुवातीला नजर आणेवारी ६५ पैसे होती. आता ही आणेवारी ४२ पैसे निघाली आहे. यावेळी ४२ पैसे निघालेली आणेवारी ही वास्तव आहे.