मलकापूरात बसखाली आल्याने अकरा वर्षिय विद्यार्थीनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:58 IST2017-12-05T13:54:05+5:302017-12-05T13:58:07+5:30
मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली.

मलकापूरात बसखाली आल्याने अकरा वर्षिय विद्यार्थीनीचा मृत्यू
मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली.
तालुक्यातील म्हैसवाडी येथील रहिवाशी असलेली संजना गजानन लोणे (वय ११) ही धरणगाव येथील हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी ती नरवेल येथून शाळेत येण्यासाठी निघाली. शाळेत जाण्याच्या लगबगीत संजनाने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बस सुरु झाली होती. अशात प्रवाशाचा धक्का लागून तिचा तोल गेला. तिच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने तिचा जागिच मृत्यू झाला. प्रवाशांसह नागरिकांनी बसची तोडफोड करीत बस पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.