अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:22+5:302021-08-22T04:37:22+5:30
बुलडाणा : अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेच्या ...
बुलडाणा : अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे़ त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्ट राेजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे़
काेराेनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा राज्य शासनाने रद्द केला हाेता़ त्यामुळे, इयत्ता नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गंत मुल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला आहे़ तसेच शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीइटी घेण्याची घाेषणा केली हाेती़ त्यासाठी अर्ज भरण्यास प्रारंभही झाला हाेता़ मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठी हाेणारी सीइटी परीक्षा रद्द केली आहे़ या निर्णयानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे़ दहावीचे एकूण ४० हजार ९०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तसेच अकरावीच्या ४५ हजार ६४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे़ १८ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज वितरण व स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे़ २३ ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत़
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
प्रवेश अर्ज वितरण व स्वीकारणे-१८ ते २3 ऑगस्ट
यादी प्रकाशित करणे, आक्षेप स्वीकारणे -२४ ते २६ ऑगस्ट
पहिली गुणवत्ता यादी प्रकाशित करणे-२७ ऑगस्ट
पहिल्या यादीतील प्रवेश देणे -२७ ते ३१ ऑगस्ट
दुसरी गुणवत्ता यादी लावणे-२ सप्टेंबर
दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश- २ ते ३सप्टेंबर
तिसरी गुणवत्ता यादी लावणे -२ ते ३ सप्टेंबर
तिसऱ्या यादीतील प्रवेश देणे -२ ते ३सप्टेंबर
तिसऱ्या यादीतील प्रवेश देणे -४ ते ६ सप्टेंबर
जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ४०,९०४
अकरावीच्या एकूण जागा ४५ हजार ४४०
कला शाखा -१७, ८२०
विज्ञान शाखा -२३,९८०
वाणिज्य शाखा -३,६४०