‘एल्गार’ मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे- बोंद्रे

By admin | Published: July 11, 2017 12:03 AM2017-07-11T00:03:16+5:302017-07-11T00:47:23+5:30

एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्र्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी तालुका काँगे्रस कमिटीच्यावतीने आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत केले.

'Elgar' to join thousands of people in the campaign - Bondre | ‘एल्गार’ मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे- बोंद्रे

‘एल्गार’ मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे- बोंद्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातील एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्र्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी तालुका काँगे्रस कमिटीच्यावतीने आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत केले.
शासनाच्या कर्जमाफीबद्दलच्या अत्यंत किचकट अशा निकषांचा निषेध तसेच भाजपा सरकारचे शेतकऱ्यांंप्रति अतिशय उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून फसव्या कर्जमाफीच्या विरोधात काँग्रेसने १२ जुलैपासून ‘एल्गार’ पुकारला आहे. त्यानुषंगाने चिखली बाजार समितीमध्ये जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, उपसभापती ज्ञानेश्वर सुरूशे, समाधान सुपेकर, रमेश सुरडकर, शिवनारायण म्हस्के, गफार पटेल, सत्तार पटेल, लक्ष्मणराव आंभोरे, आदी पदाधिकाऱ्यांसह बाजार समितीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य, विविध फ्रंटलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या बैठकीत एल्गार मोर्चाबाबत नियोजन करण्यात येऊन आ.बोंद्रेंनी मार्गदर्शक सूचना दिल्या. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती डॉ़ सत्येंद्र भुसारी, संचालन श्याम वाकदकर तर आभार संजय पांढरे यांनी मानले.

कर्जमाफीचे फॉर्म भरून देण्याच्या स्टॉलला प्रतिसाद
एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीतील कठीण निकषांमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे़त. अशा शेतकऱ्यांची मला कर्जमाफी मिळाली नाही, या आशयाचे फॉर्म भरून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगाव मोहीम राबविणे सुरू केले आहे़ त्याचाच भाग म्हणून १० जुलै रोजी जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुचनेनूसार चिखली शहरात वेगवेगळ्या सहा ठिकाणी बुथ (स्टॉल) लावण्यात आले होते़ या बुथवर फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती, तर तालुका व शहर कॉगे्रस कमिटी आणि युवक कॉगे्रसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेतले़ यावेळी प्रदेश कॉगे्रसचे सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: 'Elgar' to join thousands of people in the campaign - Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.