दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: September 6, 2014 01:05 AM2014-09-06T01:05:47+5:302014-09-06T01:05:47+5:30
खागवाव तालुक्यातील नागापूर येथील महिलांचे दारूबंदीसाठी आंदोलन.
खामगाव : गावात खुलेआमपणे चालू असलेली दारुविक्री बंद करण्याकरिता आज ५ सप्टेंबर रोजी नागापूर येथील महिलांनी खामगाव तहसीलदारांना निवेदन दिले. तालुक्यातील नागापूर या गावात गावठी तसेच देशी दाुरची खुलेआम विक्री होत आहे. यामुळे नागरिकांसोबतच लहान मुलेही दारुच्या आहारी जात आहे. तरुणपिढी व्यसनाधिन होत असल्याने मुलांवर अयोग्य संस्कार होत आहेत. दारुड्यांमुळे गावात नेहमी छोटेमोठे वाद उद्भवतात. या भांडणाचा विशेष करुन महिलांना जास्तीचा त्रास सहन करावा लागत आहे. अवैधरित्या दारुविक्री बरोबरच जुगाराचा अड्डाही चालविल्या जात असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे. दररोजच्या या दारुड्यांमुळे इतर नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून गावातील अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. या निवेदनावर अंजना इंगळे, शकुंतला घाईट, द्वारकाबाई सरदार, कमला वाकोडे, रुख्माबाई महाले, सुनंदा अवचार, शोभाबाई वासनकर, लिलाबाई सरदार, बेबीबाई हिवराळे यांच्यासह बहुसंख्य महिलांच्या स्वाक्षरी आहेत.