नोकरभरतीसाठी चार कंपन्यांच्या निविदा पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 05:07 PM2020-12-15T17:07:21+5:302020-12-15T17:07:27+5:30
Khamgaon News पात्र ठरणाऱ्या एका संस्थेला राज्याच्या नोकरभरतीचा कंत्राट दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : महायुती शासनाच्या काळातील नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यानंतर महा परीक्षा पोर्टलचे काम महाआघाडी शासनाने थांबवले. त्याचवेळी नव्या एजंसीची निवडप्रक्रिया निविदेतून केली जात आहे. त्यासाठी चार एजंसी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी एका एजंसीची लवकरच निवड केली जाणार आहे.
महायुती शासनाच्या काळात राज्यात तलाठी, वनरक्षक पदाच्या मेगाभरतीत महा परीक्षा पोर्टलने मोठा घोटाळा केल्याच्या तक्रारी झाल्या. तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तर घोळ उघड झाला आहे. विशेष म्हणजे, त्यानंतरही महा परीक्षा पोर्टलवर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यातच राज्यभरात मोठा घोटाळा झाल्याने महा परीक्षा पोर्टलसाेबतचा करार रद्द करण्यात आला.
तसेच फेब्रुवारी २०२० पासून नवीन संस्थेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्याचे ठरले. त्यासाठी महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळाने १३ मार्च २०२० रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्या निविदाप्रक्रियेत १८ संस्थांनी सहभाग घेतला. त्या संस्थांची पडताळणी ११ डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यामध्ये चार संस्था पात्र ठरल्या आहेत. त्या पात्र संस्थांची इतर निकषाच्या आधारे पुन्हा पडताळणी होणार आहे.
त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या एका संस्थेला राज्याच्या नोकरभरतीचा कंत्राट दिला जाणार आहे. त्यामुळे आता राज्यातील मेघाभरतीची प्रक्रीया निवड होणाऱ्या कंपनीकडून राबविली जाणार आहे.