पेरणीच्या वेळी हाेणारे वाद मिटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:36+5:302021-06-03T04:24:36+5:30

विद्यापीठाने परीक्षा फी परत द्यावी बुलडाणा : कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विद्यापीठाने घेतलेला ...

Eliminate disputes at the time of sowing | पेरणीच्या वेळी हाेणारे वाद मिटवा

पेरणीच्या वेळी हाेणारे वाद मिटवा

Next

विद्यापीठाने परीक्षा फी परत द्यावी

बुलडाणा : कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विद्यापीठाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा फी ची रक्कम परत करावी, अशी मागणी अक्षय राऊत यांनी केली आहे़

बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

धामणगाव बढे : परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत़ अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे़ पेरणी सुरू हाेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे़

क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

माेताळा : एकास उधारीत मटन न दिल्यामुळे चार जणांनी मांस विक्रेत्यास मारहाण केल्याची घटना ३१ मे च्या संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सारोळा मारोती येथे घडली आहे. प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आकाश प्रकाश गुंजकर ,आनंदा शेषराव गायकवाड, निलेश शेषराव गायकवाड आणि मंगेश शेषराव गायकवाड आदी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

पंजाबराव ईलग यांची संघटनमंत्री पदी निवड

बुलडाणा : येथील पंजाबराव ईलग यांची आंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या संघटकमंत्री पदी २८ मे रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती त्यांचे सामाजिक कार्य पाहता करण्यात आल्याचे त्यांच्या नियुक्ती पदात नमूद करण्यात आले आहे. या निवड लोकरक्षक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिषेक हिन्दु , राष्ट्रीय संयोजक महेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव शिंदे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.

तंटामुक्त गाव समितीची अध्यक्ष अविनाश राजे

किनगाव राजा : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या महात्मा गांधी ग्राम तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रा. अविनाश संभाजीराव राजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या ठरावाने एकमत घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोरोनाने खचणाऱ्या रुग्णांसाठी जनजागृती

बुलडाणा : कोरोना आजाराने खचणाऱ्या रुग्णासाठी वन्यजीव सोयरे यांनी जनजागृती करत चित्रफित तयार करुन वाघ व्हा, हा संदेश दिला आहे. सगळीकडे नकारात्मक वातावरण निर्माण झाले असून वन्यजीव सोयरे यांनी “वाघ व्हा” चित्रफित द्वारे रुग्णासाठी सकारात्मक संदेशाद्वारे वन्यजीव सोयरे, कडून जनजागृती करण्यात येत आहे.

घरगुती उपचारांकडे ग्रामस्थांचा कल

सुलतानपूर : कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी अवघं जग आपापल्या परीनं पाऊल उचलत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. या सोबतच गावोगावी अनेक गावकरी आयुर्वेदाची कास धरू लागल्याचे दिसत आहे. आजीबाईच्या बटव्याची उपचार पद्धती अवलंबत आहेत. सकाळी उठताच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या व त्यासोबतच गुळवेल, दुधामध्ये हळद, लवंग, दालचिनी, मिरची पूड असा काढा घेतला जाऊ लागला आहे.

पशुखाद्यांच्या दर वाढल्याने शेतकरी त्रस्त

बुलडाणा : राज्यात कोरोना महामारीचे संकट गडद होत चालले असल्याने लॉकडाऊनच्या भीतीने व्यापाऱ्यांकडून शेतीमालाचे दर पाडले जात आहेत. याचा परिणाम म्हणून ऐन उन्हाळ्यात दूध दरवाढ थांबली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याउलट पशुखाद्य दराचा भडका उडाला आहे. कोरोना संकट दूध व्यवसायाला मारक ठरू लागला आहे.

विवाहितेचा विनयभंग, गुन्हा दाखल

माेताळा : रोहिणखेड येथील एका ५५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना ३० मे च्या संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. तक्रारीवरून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी मो. इसाक मो. चिरागोद्दीन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते करत आहेत.

काेराेनाविषयी जनजागृती करण्याची गरज

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक ग्रामीण भागातही झाला हाेता़ लोकांमध्ये कोरोनाबाबत बरेच गैरसमज आहेत, भीती आहे़ त्यामुळे कोरोनाच्या बाबत योग्य जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत शिवराज शिक्षण संस्था अंत्री तेली अध्यक्ष नरेश शेळके यांनी केले़

Web Title: Eliminate disputes at the time of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.