ऑनलाईन अर्जात तांत्रिक अडचणींचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:09 AM2020-07-28T11:09:28+5:302020-07-28T11:09:39+5:30
पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीप पीक विम्याचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
महाभूमीलेख, आधार आणि विमा कंपनीची वेबसाईट एकाच वेळी सुरळीत सुरू राहील्यास आॅनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण होते. या तीनपैकी काही वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पीक विमा काढण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना अनियमीत पावसाचा फटका बसतो. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. यावर्षीपासून ही योजना तीन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.
शेतकºयांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकºयांना प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै ही मुदत आहे. मात्र; गत दोन दिवसांपासून ‘लोड’ वाढल्याने विमा कंपनीचे सर्व्हरची गती मंदावलीे आहे. त्यामुळे, अनेक शेतकºयांचे अर्ज भरल्याच गेले नाहीत. विम्याचे अर्ज भरताना सर्वात आधी आधार प्रमाणिकरण करण्याची गरज आहे. त्यानंतर सात बारा प्रमाणीत करण्यात येतो. या बाबींची पडताळणी झाल्यानंतर फॉर्म भरला जातो. अनेक शेतकरी एकाच वेळी फार्म भरत असल्याने अडचणी येत आहेत.
एक अर्ज भरण्यासाठी लागतो अर्धा तास
ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच नेटवर्कही राहत नसल्याने पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना ताटकळत रहावे लागत आहे.
सात बारासाठी आठ ते दहा वेळा गट नंबर टाकल्यानंतर प्रमाणीकरण होत असल्याने शेतकºयांचा वेळ जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे एक अर्ज भरण्यासाठी २५ ते ३० मिनीट लागत आहेत.
तसेच मिश्र पिक एकत्र टाकल्यास अर्ज सबमिट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, प्रत्येक वेळी एका एका पिकाची निवड करावी लागत असल्याने अर्ज भरण्यास विलंब होत आहे.
सर्व शेतकरी एकाच वेळी आॅनलाईन अर्ज भरत असल्याने अडचणी येत आहेत. सर्व्हरची क्षमता वाढविण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. ही अडचण लवकरच दूर होणार आहे.
-विजय सरोदे,
प्रभारी तालुका कृषी अधिकारी,लोणार