समाजाच्या कल्याणासाठी सेवा-समर्पणाचा अंगीकार करा - देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:58 PM2018-12-26T13:58:04+5:302018-12-26T13:58:09+5:30
विद्यार्थ्यांनी समाजाच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने झटावे, असे प्रतिपादन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप देशमुख यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : समाजातील दु:खीतांच्या वेदना वेचल्यास वेद वाचण्याचीही गरज नाही. कुणालाही दु:ख न देता विश्व कल्याणाची संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी अंगिकारली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने झटावे, असे प्रतिपादन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप देशमुख यांनी येथे केले.
आंबेटाकळी येथील जागृती ज्ञानपीठमध्ये आयोजित ‘संस्कार-सेवा-समर्पण’या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक राऊत होते. प्रमुख व्याख्याते म्हणून शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांची तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अमोल भाकरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी देशमुख पुढे म्हणाले की, जीवनात दुसºयांच्या वेदना आणि दु:ख वेचले की आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही. आई-वडिलानंतर गुरूजनांचा आदर केल्यास जीवन सफल होते. असे ते म्हणाले. संचालन अंजली काळणे या विद्यार्थीनीने केले. आभार धनश्री टिकार हीने मानले.