देऊळगाव राजा तालुक्यात स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतीशाळांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:26+5:302021-08-27T04:37:26+5:30
शेतीशाळेमध्ये कपाशी पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण याबद्दल कृषी सहाय्यक श्रीकांत पडघान यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कपाशी पिकामध्ये आता सध्या ...
शेतीशाळेमध्ये कपाशी पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण याबद्दल कृषी सहाय्यक श्रीकांत पडघान यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कपाशी पिकामध्ये आता सध्या पाते आणि फुलोरा अवस्थेत आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन कृषी विभागाने बोंड आळी सर्वेक्षण करणे आणि नियंत्रणासाठी लोकांमध्ये जागृती करणे सुरू आहे. २ ऑगस्टपासून देऊळगावराजा तालुक्यातील कृषी सहाय्यक विविध ठिकाणी बोंड आळीचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाबरोबरच बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्याच्या अगोदर लक्षात यावा, यासाठी एकरी दोन फेरोमोन ट्रॅप शेतामध्ये लावून उपस्थित शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅपद्वारे सर्वेक्षण कसे करावे? आर्थिक नुकसान पातळी कशी तपासावी? त्या आधारे गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत शेतकऱ्यांना बोंड आळी व्यवस्थापनासाठी अनंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.
..असा ओळखा बोंडअळीचा प्रादुर्भाव
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला किंवा नाही हे तपासण्यासाठी शेतामध्ये एकरी किमान दोन फेरोमोन ट्रॅप लावावेत. त्यामध्ये ट्रप्सच्या प्लॅस्टिक पिशवीत किती पतंग जमा झाले याबाबत दररोज निरीक्षणे घ्यावीत. त्या निरीक्षणामध्ये सतत तीन दिवस प्रतिट्रॅप आठ पतंग आढळल्यास त्या ठिकाणी सेंद्रिय बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजावे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
१) कपाशीवरील फवारणी शक्यतो सायंकाळच्या वेळेस करावी कारण फवारणीमधील कीटकनाशकद्वारे चांगले नियंत्रण यावेळी दिसून येते.
२) शेतातील सर्व डोम कळ्या वेचून त्या नष्ट कराव्यात.
३) प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
६) प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी ३० मिली किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के ईसी अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.