महिलांना आत्मनिर्भर बनविण्यावर भर - राजकुमारी चौहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 08:01 PM2020-12-05T20:01:03+5:302020-12-05T20:01:12+5:30
मानिनी च्या अध्यक्षा राजकुमारी चौहाण यांच्याशी साधलेला संवाद.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : समाजातील उपेक्षीत तसेच गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्याअनुषंगाने महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासोबतच रोजगार मेळावे आणि कार्यशाळा घेतल्या जात आहेत. महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठही उपलब्ध करून दिली जात आहे. मानिनी च्या अध्यक्षा राजकुमारी चौहाण यांच्याशी साधलेला संवाद.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाबाबत काय सांगाल?
उपेक्षीत आणि तळागाळातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गत वर्षभरापासून सातत्याने ह्यमानिनीह्णच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. वर्षभरात २७ प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. १४ रोजगार निर्मिती कार्यशाळा आणि ५ व्यावयायिक शिबिरे आयोजित करण्यात आल्या. महिलांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्यासाठी मानिनी चे प्रयत्न आहेत.
कोरोना काळात महिला सक्षमी करणासाठी कोणते प्रयत्न केलेत?
कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेक महिला बेरोजगार झाल्यात. काहींचे कुटुंब देशोधडीला लागले होते. अशा परिस्थितीत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दीपावलीकाळात महिलांना व्याससायिक दालन उपलब्ध करून दिले. या दालनाचा ग्रामीण भागातील महिलांनाही लाभ झाला.
सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने प्राधान्य कोणत्या गटातील महीलांना दिल्या जाते?
समाजातील असंख्य महिला स्वातंत्र्यानंतरही हलाखीचे जीवन जगत आहेत. ग्रामीण भागातील महिलांची आजही उपेक्षा होताना दिसते. अशा महिलांना तसेच समाजातील उपेक्षीत आणि गरजवंताना मदतीसाठी ह्यमानिनीह्णचा पुढाकार आहे. दिव्यांग महिलांच्या मदतीसाठी ह्यमानिनीह्णचे प्राधान्य आहे. दीपावलीच्या व्यावसायिक दालनात दिव्यांग महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रथम प्राधान्य देण्यात आले. यातून जिल्ह्यातील शेकडो महिलांना मदत झाली.
महिलांना आत्मनिर्भर करताना त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात का?
निश्चीतच, महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठीच ह्यमानिनीह्णचे सुरूवातीपासूनच प्रयत्न आहेत. महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासोबतच त्यांचे समुपदेनही केले जाते. जिल्ह्यातील तुटू पाहणारे अनेक संसार जुळविण्यासाठी मानिनी ची भूमिका महत्वाची राहीली आहे.