तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणा बळकटीकरणावर भर : शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:04+5:302021-05-12T04:35:04+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीनंतर रविवारी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीनंतर रविवारी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सर्वंकष आढावा घेऊन प्रत्यक्षात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने १६ मे रोजी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. ९ मे रोजीच्या बैठकीत आनुषंगिक विषयावर प्राथमिक स्वरुपात चर्चा झाली असल्याचेही ते म्हणाले. सोबतच तालुकास्तरावरून आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून, जिल्हा नियोजनासह प्रसंगी राज्य शासनाच्या विशेष निधीमधून पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तालुकानिहाय आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर येत्या काळात आमचा भर असून, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्डबॉय, अैाषधी, उपकरणे उपलब्ध करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय ते प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, यासाठीचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.