कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांवर भर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:22+5:302021-02-17T04:41:22+5:30
दरम्यान, या बैठकीस जिल्ह्यातील सर्व एसडीअेा, तहसिदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, पालिकांचे मुख्याधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ...
दरम्यान, या बैठकीस जिल्ह्यातील सर्व एसडीअेा, तहसिदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, पालिकांचे मुख्याधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३४ हजार ७९८ संदिग्धांचे नमुने घेण्यात आले असून या पैकी १५ हजार २६ जण पॉझिटिव्ह आले आहे तर १४२२१ संदिग्ध रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याचे सांगण्यात आले.
सध्या जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी मास्कचा वापर करण्याबाबत सुचना देण्यात आल्यास असून त्याचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशच जिल्हाधिकारी यांनी सांगितले. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोधही योग्य पद्धतीने घेण्यात यावा, अशा सूचना आरोग्य विभागास दिल्या आहेत. थोडक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक गांभीर्याने करण्याबाबत प्रशासनाचे एकमत झाले. तालुकास्तरावरील यंत्रणांनी यामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासोबत दुर्धर आजार असणाऱ्यांच्या चाचण्या करण्याबाबत गंभीरता घेऊन प्रत्येक तालुक्यात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधासंदर्भातील नियम अधिक गंभीरतेने पाळावेत, असे स्पष्ट केले. दरम्यान प्रसंगी त्यांना होम आयसोलेशन देण्यात येऊ नये, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
कोरोना मृत्यूदर १२ टक्क्यांवर
जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा अलिकडील काळात ११ टक्क्यांवरून १२ टक्क्यावर पोहोचला आहे. त्यातच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ टक्क्यांवर आहे. मात्र मृत्यूदरासोबतच बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी तर बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे २१ टक्क्यांवर पोहोचले होते. त्यावरून या विषयाची गंभीरता निदर्शनास यावी.