काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 AM2021-06-01T04:25:46+5:302021-06-01T04:25:46+5:30

चिखली : कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून अनुराधा कोविड सेंटरमध्ये अव्याहतपणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथून अनेक रुग्ण ...

Employ staff at Cavid Care Center | काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

Next

चिखली : कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून अनुराधा कोविड सेंटरमध्ये अव्याहतपणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. या सेंटरवर आजरोजी गरजू रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध करून देण्याकरिता वैद्यकीय व अवैद्यकीय कर्मचारी संख्याबळ अपुरे पडत आहेत. त्यामुळे आराेग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती व आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी चिखली शहर काँग्रेसच्यावतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

चिखली येथील अनुराधा कोविड सेंटरमध्ये सद्यस्थितीत सुमारे ७० रुग्ण दाखल आहेत. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय व अवैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, वाॅर्डबॉय, सफाई कर्मचारी संख्याबळ अत्यंत कमी असल्याने रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याकरिता उपरोक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्याचप्रामणे या कोविड सेंटरवर सॅनिटायझर, मास्क इत्यादी साहित्याचा तुटवडा असल्याचा आरोप करीत या सर्व बाबी तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचबरोबर शासकीय निर्देशानुसार कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात व्याव्यात; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, डॉ. मो. इसरार, राजू रज्जाक, डॉ. अमोल लहाने, पप्पू जागृत, कैलास जंगले, अ‍ॅड. विलास नन्हई, दत्ता सोनुने, प्रजल तिडके, पवन तायडे, गोपाल जाधव, गौरव मुंडलिक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Employ staff at Cavid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.