बुलडाणा येथे पार पडला भाजपा दिव्यांग सेलचा रोजगार मार्गदर्शन मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:39 PM2017-12-12T13:39:47+5:302017-12-12T13:41:35+5:30
बुलडाणा : सामाजिक न्याय भवन येथे भाजपा दिव्यांग सेलच्या अंतर्गत दिव्यांगासाठीच्या रोजगार व मार्गदर्शन मेळावा ९ डिसेंबर रोजी पार पडला.
बुलडाणा : सामाजिक न्याय भवन येथे भाजपा दिव्यांग सेलच्या अंतर्गत दिव्यांगासाठीच्या रोजगार व मार्गदर्शन मेळावा ९ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव डोंगरदिवे व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री विश्वनाथ माळी, भारत स्वच्छता अभियानाचे गणेश पाटील, दत्तात्रय ठाकरे, पी.पी.पवार, प्रताप जाधव आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून नामदेवराव डोंगरदिवे यांनी अपंगांच्या विविध समस्या व्यासपीठावरून व्यक्त केल्या. त्यामध्ये नोकरीचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, व्यवसायासाठी जागा, कर्ज प्रकरण, दारिद्रय रेषा रेशन कार्ड समायोजन, ३ टक्के विकास निधी अपंगांच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न, अपंगांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण या व इतर विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या विषयाला अनुसरून भाजपाचे महामंत्री विश्वनाथ माळी यांनी वरील सर्व प्रश्न पालकमंत्री तथथा मुख्यमंत्री महाराष्टÑ राज्य तसेच विविध विभागाचे अधिकारी यांचेकडे मार्गी लावण्यासाठी सोबत राहील, अशी ग्वाही दिली आहे. या कार्यक्रमात भारत स्वच्छता अभियानाचे गणेश पाटील यांनी माहिती देऊन ज्याठिकाणी आपल्याला घाण व कचरा दिसल्यास लगेच अॅपवर लोड करून पाठविण्याचे शिकविले. प्रास्ताविक ठाकरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन पी.पी.पवार यांनी केले.