अतिक्रमण धारकांचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे
By अनिल गवई | Published: January 31, 2024 05:01 PM2024-01-31T17:01:11+5:302024-01-31T17:01:42+5:30
यावेळी उपस्थितांनी तीव्र निदर्शने केली. त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
खामगाव: अतिक्रमण धारकांच्या विविध मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात अतिक्रमण धारकांनी बुधवारी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे दिले. यावेळी उपस्थितांनी तीव्र निदर्शने केली. त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, गत काही दिवसांपासून बहुजन भूमिहिन अतिक्रमण धारकांना प्रशासकीय तसेच शासकीय स्तरावरून त्रास दिल्या जात आहे. अतिक्रमण धारकांना सुरक्षा पोहोचविण्यासाठी बहुजन भूमिहीन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे देण्यात यावे. दलित अत्याचाराला आळा घालण्यात यावा, कर्ज मुक्तीसाठी आणि आत्महत्या करणार्यांना घरकुले देण्यात यावी. राज्यातील दलित अत्याचार थांबविण्यासाठी एक स्वतंत्र विदर्भ राज्य बनविण्यात यावे. सोबतच खामगाव जालना रेल्वे लाइनच्या कामास तात्काळ सुरू करण्यात यावे आदी मागण्यासाठी बहुजन भूमी मोर्चाच्यावतीने धरणे देण्यात आले. या निवेदनावर भूमिमुक्ती मोर्चाच्या अनेक पदाधिकार्यांच्या स्वाक्षरी आहेत.