अखेर २१ व्या दिवशी वाजली दाऊदपूरच्या शाळेची घंटा

By admin | Published: September 24, 2015 01:25 AM2015-09-24T01:25:13+5:302015-09-24T01:25:13+5:30

नऊ विद्यार्थ्यांंची हजेरी, नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक दोन तास अतिरिक्त शिकवणार.

At the end of the 21st day, the bell of the school of Dawoodpur | अखेर २१ व्या दिवशी वाजली दाऊदपूरच्या शाळेची घंटा

अखेर २१ व्या दिवशी वाजली दाऊदपूरच्या शाळेची घंटा

Next

धानोरा महासिद्ध ( जि. बुलडाणा) : शाळा जागेवरून दोन आदिवासी जमातीमधील वादामुळे २0 दिवस बंद असलेल्या दाऊतपूर येथील जिल्हा परिषद शाळेची घंटा अखेर २१ व्या दिवशी वाजली. हा वाद सामोपचाराने मिटविण्यात येऊन शिक्षक यात दोषी नसल्याचा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला. परिणामी दोन शिक्षकांसह केंद्रप्रमुखावरील निलबंनाची टांगती तलवार तथा एक वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, २३ सप्टेंबरच्या अंकात जागेच्या वादात ह्य२0 दिवसापासून शाळा बंदह्ण या शीर्षकाखाली ह्यलोकमतह्णने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात पथक पाठवून ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व जागामालक यांची समन्वय बैठक घेऊन तोडगा काढल्याने विद्यार्थ्यांंंच्या अध्ययनातील खोडा दूर झाला. दाऊतपूर येथील शाळेसाठी जागा दान देणारा, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये जागेसह खिचडी शिजविणे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदाच्या कारणावरून वाद होता. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून ग्रामस्थांनी पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले होते. दोन आदिवासी जमातीमधील वादाचीही किनार या विषयाला होती. वर्ग पहिली ते पाचवीपर्यंंंत येथे जिल्हा परिषदेची शाळा असून, त्यामध्ये २६ विद्यार्थी शिकतात. आता हे प्रकरण निवळले आहे. जिल्हा परिषद सदस्य ज्योती ढोकणे, पंचायत समिती सभापती सविता राऊत, उपसभापती विजय काळे, सुनील येनकर, सरपंच महानंदा पुरी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी पी. पी. खिरोडकर यांनी २३ सप्टेंबरला समन्वय बैठक घेऊन हा वाद समजून घेत उभयंतांनी त्यावर तोडगा काढला. दरम्यान, या बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाची पुन्हा निवड करण्यात येऊन जागामालकाकडून पुन्हा वाद उपस्थित न करण्याचे लिहून घेत त्यांच्या समस्याही जाणून घेण्यात आल्या. शिक्षण विभागाची भूमिका पाहता पालकांनी पाल्यांना शाळेत आणत शाळा पूर्ववत सुरू केली. यावेळी एकनाथ वनारे, संघपाल अवचार, विस्तार अधिकारी डी. बी. दातायडे, केंद्रप्रमुख एस. एस. चव्हाण, धीरज मारोळे व ग्रामस्थ उपस्थित होते

Web Title: At the end of the 21st day, the bell of the school of Dawoodpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.