सप्टेंबर अखेर डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:45 AM2020-09-11T11:45:19+5:302020-09-11T11:45:51+5:30
गेल्या काही दिवसात लोणार व खामगाव शहरात डेंग्यूचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता येत्या काही दिवसात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया रोगाचा प्रसार होण्याची भीती आरोग्य यंत्रणेला सतावत आहे. दरवर्षी पावसाळ््यानंतर या साथरोगांचा प्रसार होत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असल्याने सप्टेंबर अखेर या साथरोगाची परिस्थिती गंभिर होण्याची चिन्हे आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात लोणार व खामगाव शहरात डेंग्यूचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सध्या ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, ताप, खोकला या आजाराची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण अधिकच वाढला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर चांगला ताण येत असतानाच आता वातावरण बदल तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची भर पडत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट अखेरपर्यत डेंग्यूचे १९ व मलेरियाचे ३ रूग्ण आढळले आहेत. त्यामूळे आरोग्य यंत्रणेद्वो खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या दोन्ही साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांना आवश्यक सूचना आरोग्य विभागाने दिल्या.
खामगावातील रूग्णांच्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यूचे रूग्ण असल्याने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
- डॉ. एस.बी.चव्हाण,
जिल्हा हिवताप अधिकारी,
बुलडाणा