इंजिनीअरिंग आॅनलाइन प्रवेश परीक्षेला सापडला मुहूर्त; २ ते १३ मेदरम्यान होणार प्रवेश परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:00 PM2018-12-28T17:00:32+5:302018-12-28T17:00:56+5:30
बुलडाणा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षी आॅफलाइन घेण्यात आली होती.
बुलडाणा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षी आॅफलाइन घेण्यात आली होती. मात्र यावर्षी आॅनलाइन प्रवेश परीक्षेला मुहूर्त मिळाला आहे. २ ते १३ मे या कालावधीत ‘एमएचटी सीईटी’ ही परीक्षा आॅनलाइन होणार आहे. या कक्षातर्फे विविध १६ अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाºया परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यामुळे विद्यार्थी तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रथम वर्ष इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा आॅनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. २०१९ मध्ये मे महिन्याह्या या परीक्षा होणार असून त्याचा कालावधी १६ ते २० दिवसांचा राहणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यता येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा सुद्धा यंदा २ ते १३ मे या कालावधीत आॅनलाइन होणार आहे. राज्यातील इंजिनीअरिंग तसेच निमवैद्यकीय सेवा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देतात. राज्य प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आॅनलाइन करावी, अशी सूचना राज्य सरकारने कक्षाला २०१७ मध्ये केली होती. मात्र त्यावेळेस पूर्वतयारी न झाल्याने आॅफलाइन परीक्षा घेण्यात आली होती.
परंतू यावर्षी ह्या परीक्षा आॅनलाईन घेण्याचे नियोजन करण्यात आले असून काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात इंजिनीअरिंग (एमएचटी सीईटी) २ ते १३ मे, एमएमएस परीक्षत्त ९ व १० मार्च, एमसीए २३ मार्च व लॉ (पाच वर्षे) २१ एप्रिल रोजी होणार आहे. हे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक संबंधीत संकेतस्थळावर आॅनलाइन जाहीर करण्यात आले आहे.
अभिप्राय प्रश्नावली
यापूर्वी सीईटी आॅफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र, आता सीईटी आॅनलाइन घेण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांच्याकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी सीईटी सेलने या संकेतस्थळावर माहितीसह दहा प्रश्नांची प्रश्नावली प्रसिद्ध केली होती. ही प्रश्नावली विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांना भरण्यासाठी उपलब्ध केलेली आहे.