नाविण्यपूर्ण उपक्रमातून मुलांना इंग्रजी विषयाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 03:27 PM2020-01-12T15:27:55+5:302020-01-12T15:28:15+5:30
ई-टिच पोग्राम ह्या नावाने हा उपक्रम २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील ३९ तालुक्यामधील ११६० शाळामध्ये राबविल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गुणवत्ता पूर्णशिक्षण हे प्रत्येक मुलांचा हक्क असून ग्रामीण भागातील मुलानाही खाजगी शिक्षण व्यवस्थेप्रमाणे इंग्रजी सहज शिकता यावे व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम द बॉम्बे कमिन्युटी पब्लिक ट्रस्ट मुंबई चाईल्ड राईट्स अलायन्स व अपेक्षा होमिओ सोसायटी यांच्या संकल्पनेतून ई-टिच पोग्राम ह्या नावाने हा उपक्रम २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील ३९ तालुक्यामधील ११६० शाळामध्ये राबविल्या जात आहे. ह्या प्रकल्पामध्ये बुलढाणा जिल्यातील सावित्रीबाई फुले महिला मंडळ देउळगाव साकारशा व अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्था मलकापूर वतीने बुलढाणा जिल्ह्यात कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात येत आहे.
शिक्षणाबाबत असणारे उदासीन धोरण आणि पालकांचा इंग्रजी विषयाकडे वाढणारा कल, यामुळे सरकारी शाळामध्ये मोठ्या प्रमाणात होणाºया गळतीला रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न शासन व संस्था पातळीवर होत असून इंग्रजीची गरज लक्षात घेवून, पालक खाजगी कॉन्हेटकडे वळत आहे. हे महागडे शिक्षण सर्वसामान्य पालकांना परवडणारे नाही.भविष्याचा विचार लक्षात घेवून सरकारी शाळा गुणवत्ता पूर्ण करणे आणि वर्तमानातील इंग्रजी विषयाची गरज लक्षात घेवून मुलांना सहज व सोप्या भाषेत इंग्रजी शिकता यावे यासाठी मनपा व जी प सरकारी शाळामध्ये इंग्रजी शिकविण्याचा नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये वर्ग १ ते ५ वगार्चे संपूर्ण इंग्रजी अभ्यासक्रमाचे पुस्तक पेज टू पेज डिजिटल करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम कार्टून स्वरुपात केला असून शिक्षकाला शिकवायला व मुलांना शिकायला खूप आकर्षिक असून दृक्श्राव्य माध्यमाचा उपयोग केला असल्याने शिक्षक विभागाने हि ह्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजवणी केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्रराज्य व विदभार्तील १०० शिक्षकाचा सन्मान दिनांक १२ जानेवारी २०२० ला अपेक्षा होमिओ सोसायटी गुरुकुंज मोझरी येथील किलबिल विज्ञान केंद्र येथे नंदकुमार, प्रधान सचिव महाराष्ट्रराज्य यांच्या हस्ते होणार आहे.
खामगाव, मेहकर, मलकापूर तालुक्यातील ९० शाळा
खामगाव, मेहकर व मलकापूर तालुक्यातील ९० शाळेचा ह्या उपक्रमात समावेश असून संजीवनी पवार (प्रकल्प संचालक), मारोती चवरे (नागपूर विभाग ) नरेंद्र पवार (अमरावती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे.