हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांचा संदल उत्साहात
By admin | Published: March 16, 2017 03:14 AM2017-03-16T03:14:56+5:302017-03-16T03:14:56+5:30
भाविकांची लक्षणीय उपस्थिती; ढोलताशांच्या गजरात निघाली मिरवणूक
चिखली, दि. १५ : येथील बाबुलॉज चौक परिसरातील हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांचा संदल दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने १५ मार्च रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली होती.
सैलानी बाबांचे शिष्य हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांचा स्थानिक बाबुलॉज चौक परिसरात दर्गाह आहे. सैलानीप्रमाणेच दरवर्षी होळीच्या तिसर्या दिवशी हजरत खैरूल्लाह शाह बाबांचा संदल व उरूस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. देशातील कानाकोपर्यातून सैलानी येथे येणारे सैलानी बाबांचे निस्सीम भक्त चिखली येथेही न चुकता हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांच्या दर्गाहवर दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे शहर सध्या भाविकांनी फुलून गेले असून दर्गाह परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
दरम्यान १५ मार्च रोजी खैरूल्लाह शाह बाबा यांच्या संदल शरीफ निमित्त माजी नगराध्यक्ष सलीम मेमन व मित्र परिवाराच्यावतीने उंटावरून चादर शरीफ ढोल, ताशे व नगार्यांसह वाजत-गाजत नेवून दर्गाहवर चढविण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुधीर चेके पाटील, सलीमखॉ करीमखॉ, सलीम मन्यार, हनिफ बाबा, मो.परवेज मेमन, शेख अल्ताफ, शे.सलीम मिस्तरी, रऊफ शहा, आजम बागवान, इरफा मियॉ, इरफान कुरेशी, अफजल मेमन, दिनेश जायलवाल, गोपाल मारोठे, किशन जायलवाल, समीऊल्ला खॉ, अक्रम मेमन, महेश चव्हाण, वसीम मेमन, आशीफ जमदार, सै.अजहर, मो.इकबाल, सै.जुनेद, नाजु अली, कय्युम टेलर, सै.समिर, शे.नदिम, नसीरखॉ कुरैशी, युनुस बागवान, बुढनभाई, अहेमद पहेलवान, शफी मिस्तरी, शे.शब्बीर, नंदकिशोर तातडे पाटील, मो.जावेद, समिर मेमन, सोहील मेमन, शे.इमरान, शे.इनायत, हारून मन्यार, असलम पहेलवान, अशपाक कुरैशी, मुन्ना मेमन, सै.अमिर सै.गुलाब, मुजम्मील पहेलवान, मो.हनिफ धोबी, हेमंत जायलवाल, सै.आरीफ, शे.अयाज, अनिस मौलाना, नियामत पहेलवान, सै.हनिफ यांच्यासह शेकडो भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान दुपारी अडीच वाजता हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांच्या भव्य संदल मिरवणुकीस प्रारंभ हावून बाबुलॉज चौक, जयस्तंभ चौक, राजा टॉवर, जुने गाव, मदन शहावली दर्गाह, सावजी गल्ली, चिंच परिसर, बागवान गल्ली व पोलिस स्टेशन मार्गे पुन्हा रात्री दहा वाजेच्या सुमारास दर्गाह येथे मिरवणुक विसर्जीत करण्यात आली.