पर्यावरण मासात उभारले पाच वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 11:16 AM2021-07-12T11:16:05+5:302021-07-12T11:16:19+5:30

Environment : बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण आणि खामगाव परिसरात पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

Environment : Five forest dams built during the month | पर्यावरण मासात उभारले पाच वनराई बंधारे

पर्यावरण मासात उभारले पाच वनराई बंधारे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ५ जून ते ५ जुलै या कालावधीत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवित सृष्टीमंगलम संस्थेने पर्यावरण मास साजरा केला. यामध्ये बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण आणि खामगाव परिसरात पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.
देशात श्रावण मास, अधिक मास ,कार्तिक मास मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. अशीच एक संकल्पना पर्यावरण मास म्हणून येथील सृष्टी मंगलम प्रतिष्ठाण, खामगावच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनापासून ते ५ जुलै २०२१ यादरम्यान राबविण्यात आली. या माध्यमातून शहरालगतच्या बोडख्या पडलेल्या टेकड्यांवर वृक्षारोपण तथा बीजारोपण करण्यात आले.  यामध्ये मुख्यत: घाटपुरी शिवारातील सोनबर्डी, लेकुरवाडी व नंदाखोरी तसेच सोबतच सजनपुरी येथील हंड्याबरड, तपोवन, ॠषिसंकुल आणि जनूना शिवारातील टेकडीवरील परिसरात बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण यासोबतच भारतीय कमळ रोपण व वनराई बंधारा निर्माण करून मोठ्या उत्साहात पर्यावरण मास साजरा करण्यात आला.  सृष्टी मंगलम प्रतिष्ठानचे संस्थापक संजय गुरव यांनी शहरातील इतरही सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना या उपक्रमात सामील करून घेतले. या पर्यावरण मासदरम्यान दृष्टीस पडणारे प्राणी, पक्षी, कीटक यांची ओळख व अभ्यास करण्यात आला. या उपक्रमात वयवर्ष १५ ते ७० दरम्यानच्या निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला. यामध्ये सृष्टी मंगलम प्रतिष्ठाणसोबतच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तरुणाई फाउंडेशन, लायन्स क्लब संस्कृती, राष्ट्रीय रहित सेना, शिक्षक, व्यापारी सहभागी झाले.
पर्यावरणप्रेमींचा सहभाग! 
n कलाध्यापक संजय गुरव यांची ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी  किशोर भागवत, वीरेंद्र शहा,चंद्रकांत केडीयाँ, राजेंद्रसिंग राजपूत, सौ. राजपूत, मंगला गुरव,  अमोल जोशी, मंगेश वानखेडे, गौरव इंगळे, गौरव वानखेडे, मंजितसिंग शिख, राजेश कोल्हे, अविनाश सोनटक्के, गोपाल पवार, तेजस्वी भुंबरे, श्रृती वारकड, विकास आंबेकर,  अभय अग्रवाल,  अजय अग्रवाल, नीताताई बोबडे यांनी सहकार्य केले.

‘माळ तिथे ताळ’ उपक्रमात लावली एक हजार झाडे! 
  ‘माळ तिथे ताळ’ या उपक्रमांतर्गत शहरालगतच्या माळावर (टेकडीवर) ताळ फळाच्या एक हजार बीजांचे रोपण केले. 
  तसेच वड, पिंपळासोबतच बूच (बकान) वृक्षाची तीन फुट उंचीच्या ३०० रोपांचीही लागवड करण्यात आली. १ जुलै ते ५ जुलै यादरम्यान लेकुरवाडी टेकडीवर व नंदाखोरी परिसरात पाच वनराई बंधारे निर्माण करण्यात आले.
 

Web Title: Environment : Five forest dams built during the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.