इपीएस पेन्शनर्स धारकांचे भीकमांगो आंदोलन; खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:32 PM2018-01-02T18:32:15+5:302018-01-02T18:33:59+5:30
खामगाव: इपीएस-९५ पेन्शनर्स धारकांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगवळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भीक मांगो आंदोलनही केले. त्यानंतर तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदनही सादर केले.
खामगाव: इपीएस-९५ पेन्शनर्स धारकांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगवळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भीक मांगो आंदोलनही केले. त्यानंतर तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदनही सादर केले.
देशात सुमारे ६० लाख पेन्शनर्स धारक आहे. भविष्य निर्वाह निधीत या पेन्शनर्स धारकांकडून अंशदानही केल्या जाते. मात्र, या पेन्शनर्स धारकांना २०० ते २५०० रुपयांपर्यंत पेन्शन अदा केली जाते. ही पेन्शन आजच्या महागाईच्या काळात अत्यल्प आहे. त्यामुळे पेन्शन धारकांना कमीत कमी ७५०० रुपयांचे बेसिक पेन्शन दिले जावे, तसेच या पेन्शनवर महागाई भत्ता दिला जावा. शासनाला हे शक्य नसल्यास तात्काळ किमान ५००० हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता दिला जावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत पेन्शनर्सनी भीकमांगो आंदोलन केले. त्यानंतर नायब तहसीलदार देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर कमांडर अशोक राऊत, आर.एच. डोंगरकर, प्रभाकर मेतकर, विरेंद्रसिंह, सुनील राजपूत, एस.डी.थोरात, एम.एस. मोहोकार, ए.बी. जाधव, हरिदास सुलताने, प्रभावती जोशी, भगवती अग्रवाल, रेखा पवार, शंकुतला गुप्ता यांच्यासह पेन्शनर्स धारक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आमदारांनी घेतली पेन्शनर्सची भेट!
आपल्या विविध मागण्यासाठी पेन्शनर्स असोसिएशनच्यावतीने मोर्चा आणि भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांची आमदार आकाश फुंडकर यांनी उप विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भेट घेतली. पेन्शनर्सधारकांच्या समस्या जाणून घेतल्या.