पुरग्रस्त गावात पुरनियंत्रण समित्या स्थापन करा- पियुष सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:48+5:302021-05-23T04:34:48+5:30
दुसरीकडे उपलब्ध साहित्य सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासोबतच पूर येणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची उजळणी ...
दुसरीकडे उपलब्ध साहित्य सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासोबतच पूर येणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची उजळणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.
--अतिक्रमण हटविण्याच्या सूचना--
जिल्ह्यात ग्रामीण तथा शहरी भागात नदीकाठावर तसेच नदीपात्रामध्येही काही कुटुंबे अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांचे अतिक्रमणही हटविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. अशी कुटुंबे अतिवृष्टी किंवा पुरामुळे बाधित झाल्यास त्यांना शासनाकडून मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनास विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.
--वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती--
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने किनगाव राजा, कोलारा, घारोड , बावनबीर या चार ठिकाणी वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे. प्रामुख्याने या भागात वीज पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत आहे किंवा नाही,, याचीही पाहणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.
--जीर्ण इमारतींबाबत दक्षता--
पावसाळ्यात जीर्ण इमारती पडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. ते पाहता, शहर तथा ग्रामीण भागातील अशा जीर्ण इमारतींची पाहणी अभियंत्यांमार्फत करण्यात येऊन पावसाळ्यात या इमारती राहण्यायोग्य आहेत किंवा नाही, याची खात्रीही करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.