डोणगांव येथे आयसोलेशन सेंटर उभारा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:16+5:302021-05-01T04:33:16+5:30
जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावपातळीवर कोरोना सेंटर व आयसोलेशन सेंटर उभारण्याकरिता मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी २५ ...
जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावपातळीवर कोरोना सेंटर व आयसोलेशन सेंटर उभारण्याकरिता मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिलला कार्यकारी अधिकारी यांना आदेश करून जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या गावपातळीवर कोरोना सेंटर व आयसोलेशन सेंटर उभारण्याचे आदेश दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर डोणगाव ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे गावातील रुग्ण तसेच परिसरातील इतर रुग्णांना आरोग्यसेवा मिळवून घेण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी कोरोना सेंटरला जावे लागते. आताची परिस्थिती पाहता तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा बेड उपलब्ध नसल्याने आता मात्र गावातील रुग्णांना, परिसरातील रुग्णांना रुग्णसेवा मिळणे फार कठीण झाले आहे. त्यामुळे डोणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयसोलेशन सेंटर व ५० बेडचे कोविड सेंटर उभारण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल धोटे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी डोणगावचे माजी सरपंच अरुण धांडे, किशोर वाघमारे, गणेश जूनघरे व नीलेश सदावर्ते, आदी उपस्थित होते.