चिखलीत नगर समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:48+5:302020-12-27T04:25:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : चार महिन्यांपूर्वी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडल्यानंतर श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चार महिन्यांपूर्वी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडल्यानंतर श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे भव्य राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. हे मंदिर श्रीराम भक्तांच्या योगदानातून साकारावे यासाठी देशभर प्रत्येक गावात घरोघरी जाऊन निधी संकलन केले जाणार आहे. यासाठी ‘श्रीराम मंदिर निर्माण गृह संपर्क अभियान’ राबवले जाणार असून या अभियानासाठी चिखली नगरात स्थापन करण्यात आलेल्या समितीची घोषणा २५ डिसेंबर रोजी करण्यात आली.
स्थानिक समर्पण कार्यालयात आयोजित या बैठकीस आरोग्य भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुनील जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक शरद भाला आणि नगर कार्यवाह प्रल्हाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभियान समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये नगर संयोजक विलास श्रीवास्तव, सहसंयोजक अमोल उरसाल, संतोष अग्रवाल, कोषप्रमुख ललित बारापात्रे, सहकोषप्रमुख ज्ञानेश्वर भराड, कार्यालय प्रमुख समाधान शेळके, सहकार्यालय प्रमुख भानुदास कुटे, वस्तीकार्य प्रमुख भारत दानवे, सहवस्तीकार्य प्रमुख प्रवीण महाशब्दे, प्रसिद्धीप्रमुख रेणुकादास मुळे आणि सहप्रसिद्धीप्रमुख म्हणून भिकू लोळगे यांची निवड करण्यात आली आहे.