श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या कलश रोहनाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:35+5:302021-08-21T04:39:35+5:30

श्री चक्रधर स्वामी यांचे मासरूळ सव्वा महिने याठिकाणी प्रत्यक्ष अस्तित्व होते. त्यामुळेच मासरूळ हे गावाचे नाव पडले. महिना-मास ...

Establishment of Kalash Rohana of Shri Chakradhar Swami Mandir | श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या कलश रोहनाची स्थापना

श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या कलश रोहनाची स्थापना

Next

श्री चक्रधर स्वामी यांचे मासरूळ सव्वा महिने याठिकाणी प्रत्यक्ष अस्तित्व होते. त्यामुळेच मासरूळ हे गावाचे नाव पडले. महिना-मास आणि रूळ-राहणे महिनाभर या ठिकाणी देवाचे वास्तव्य असल्यामुळेच गावाचे नाव मासरूळ पडले. देवाची मंदिरे भरपूर ठिकाणी बांधली जातात परंतु मासरूळ या गावी साक्षात देवच अवतीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांची दोन भव्य मंदिर आहेत. एक वेगळा इतिहास या मासरुळ गावाला श्री चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श लाभला असून, या सर्व संत महंतांच्या उपस्थितीत नेहमी या ठिकाणी सर्व कार्यक्रम पुजारी मंडळी यांच्या सहकार्याने पूर्णत्वास जात असतात. विशेष करून महंत आचार्य श्री लोणारकर बाबा यांचे याकडे विशेष लक्ष असून, मंदिराच्या बाबतीत ज्याही समस्या उद्भवतील त्या सर्व सोडण्यासाठी बाबांचे सर्वतोपरी प्रयत्न नेहमी दिसून येतात. त्यासाठी पुजारी मंडळीही त्यांना सहकार्य करत असते. अशा स्वरूपाचे असलेले भव्य आणि दिव्य मंदिरामध्ये वेगवेगळ्या राज्यातून ही मंडळी सतत चालू असते. अशा सर्व संत महंतांच्या गावकऱ्यांच्या पुजाऱ्यांच्या व पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत कलश रोहणाचा भव्य आणि दिव्य असा थाटामाटात कार्यक्रम पार पडला.

Web Title: Establishment of Kalash Rohana of Shri Chakradhar Swami Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.