राहेरी बुद्रुक येथे कृषी संजीवनी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:34+5:302021-07-21T04:23:34+5:30

कृषी विकासासंदर्भातील कामांचे सुक्ष्म नियोजन व प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम या समितीमार्फत केले जाते. जागतिक बँकांच्या अर्थसाहाय्याने नानाजी ...

Establishment of Krishi Sanjeevani Samiti at Raheri Budruk | राहेरी बुद्रुक येथे कृषी संजीवनी समिती स्थापन

राहेरी बुद्रुक येथे कृषी संजीवनी समिती स्थापन

Next

कृषी विकासासंदर्भातील कामांचे सुक्ष्म नियोजन व प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम या समितीमार्फत केले जाते. जागतिक बँकांच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या ग्राम कृषी संजीवनी समित्यांमध्ये सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असून, उपसरपंच हा पदसिद्ध सदस्य असतात. संबंधित गावातील कृषी व ग्रामविकास क्षेत्राशी संबंधित असलेल्या एकूण १३ व्यक्तींची यामध्ये समावेश असतो. या प्रकल्प समित्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गावाचे सविस्तर प्रकल्प नियोजित करणे, प्रकल्प आराखडा तयार करून ग्रामसभेची मान्यता घेणे, प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांवर पात्र शेतकऱ्यांची संबंधित घटकांच्या लाभासाठी निवड करणे, ही कामे या समितीकडे असते. मंडळ कृषी अधिकारी चौथे व कृषी पर्यवेक्षक जी. आर. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामसभा घेऊन या समितीची निवड करण्यात आली आहे.

अशी आहे समिती

अध्यक्ष रवींद्र बरांडे, उपाध्यक्ष सुभाषराव देशमुख, सदस्य शंकर दधरे, सदस्य जयश्री देशमुख, प्रगतशील शेतकरी संतोष देशमुख, मधुकर मगर, सीमा देशमुख, सविता गवई, अंजनाबाई अवसरमोल, देविदास देशमुख, महिला बचत गट प्रतिनिधी गोदावरी सरकटे, अनिल रगड, उज्वला गवई, अकार्यकारी सदस्य पदसिद्ध तांत्रिक सदस्य स्वाती गीते, सदस्य सचिव प्रवीण धोंगडे, सहसचिव सचिन सानप, कृषिमित्र ज्ञानेश्वर देशमुख, प्रियंका देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Establishment of Krishi Sanjeevani Samiti at Raheri Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.