अमडापूरात विलगीकरण कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:12+5:302021-06-06T04:26:12+5:30
अमडापूर : चिखली तालुक्यात अमडापूर येथे लाेकसहभागातून विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी ...
अमडापूर : चिखली तालुक्यात अमडापूर येथे लाेकसहभागातून विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी ऑनलाईन पद्धतीने केले.
किन्होळा पॅटर्न आज संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात असून गावोगावी लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटर उभी राहत आहेत. शासकीय मदतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांच्या पुढाकारातून असे कार्य होत असल्याने ग्रामस्थांमधील ऐक्य वाढून परस्परांच्या साथीने काेरोनाच्या संकटावर मात करण्याचा निर्धार होत आहे . अमडापूर चिखली तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे २५ हजार आहे. किन्होळा पॅटर्नच्या धर्तीवर अमडापूर येथे उभे राहिलेले हे कोविड आयसोलेशन सेंटर ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरणार आहे. इथे चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर , जि.प. सदस्या शैला पठाडे,सरपंच वैशाली गवई, उपसरपंच अजीजखाँ बाबेखाँ, वल्लभराव देशमुख, रि.पा.ई.चे जिल्हाध्यक्ष तथा मा.जि.प.सदस्य नरहरी गवई, श्यामभाऊ पठाडे, हैदर सेठ,अर्जुन नेमाडे, दिलीप खंदलकर,रवी पाखरे,अजीजभाई, गफ्फार पटेल , मसूद मेंबर,रफिक मेंबर, प्रकाश खराडे, सेफउल्ला , अप्पाजी देशमुख, डॉ.संजय गवई,कमर अफजल, बाबूराव सोनुने, माधव धुंदाळे, प्रताप कौसे,जिवन देवूळकर,सूरज गायकवाड,कृष्णा शिंदे, नारायण माणसकर,रुपेश गवई अक्षय टाक, आकाश माळोदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते.