सवदड येथे विलगीकरण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:36+5:302021-05-18T04:35:36+5:30
साखरखेर्डा : ग्रामीण भागामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आपले गाव कसे सुरक्षित राहील, तसेच रुग्णसंख्या ...
साखरखेर्डा : ग्रामीण भागामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आपले गाव कसे सुरक्षित राहील, तसेच रुग्णसंख्या कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे . त्या अनुषंगाने सवडद येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातच विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या आठ संशयित व्यक्तींना त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे . सवडद येथील सरपंच शिवाजी लहाने यांनी कोरोना संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते़ १५ मे रोजी सवडद येथे कोविड १९ संदर्भात सभा घेण्यात आली़ तसेच
गावातील एकूण ९ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेटी दिल्या़ १६ मे रोजी गावामध्ये कोरोना चाचणीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता . नागरिकांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन करण्यात आले होते . यामध्ये १७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये ८ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले . सहा व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले़ तर दोघे उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात गेले आहेत .